Zika virus in Karnataka: कर्नाटकात डासांमध्ये सापडला झिका वायरस,अद्याप मनुष्याममध्ये लागण नाही; आरोग्य मंत्र्यांची माहिती

एस. महेश यांनी सांगितले की, राज्यभरातून एकूण 100 नमुने गोळा करण्यात आले, त्यापैकी 6 चिक्कबल्लापूरचे, पाच निगेटिव्ह आले आणि एक पॉझिटिव्ह आढळला.

Mosquito | Representational image (Photo Credits: pxhere)

ऑगस्टमध्ये तपासणी केल्यानंतर Chikkaballapur येथील डासात झिका विषाणू आढळून आले आहे. यानंतर, तापाच्या सर्व केसेस तपासल्या जात आहेत आणि ज्या ठिकाणाहून नमुना होता त्या आसपास अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप झिका वायरस मनुष्यामध्ये आढळलेला नाही. तरिही सावधगिरी बाळगली जात असून यंत्रणा अलर्ट वर काम करत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. महेश यांनी सांगितले की, राज्यभरातून एकूण 100 नमुने गोळा करण्यात आले, त्यापैकी 6 चिक्कबल्लापूरचे, पाच निगेटिव्ह आले आणि एक पॉझिटिव्ह आढळला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)