UP Government Bans Halal Products: उत्तर प्रदेश सरकारने तात्काळ प्रभावाने हलाल-प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर घातली बंदी

उत्तर प्रदेश राज्यात हलाल प्रमाणित औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि खरेदी आणि विक्री करताना आढळल्यास, संबंधित व्यक्ती/कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

योगी आदित्यनाथ (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठी कारवाई केली आहे. राज्यात हलाल प्रमाणपत्र असलेल्या खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर शनिवारी बंदीचा आदेशही जारी करण्यात आला. आदेशानुसार, हलाल प्रमाणपत्रासह खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री यावर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्यात हलाल प्रमाणित औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि खरेदी आणि विक्री करताना आढळल्यास, संबंधित व्यक्ती/कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement