Trading Platforms Down: ट्रेडिंग प्लॅटफॉर्म Groww, Zerodhaसह CDSL वेबसाईट डाऊन, वापरकर्ते चिंतेत

अॅप डाऊन झाल्याने वापरकर्त्यांच्या चिंता वाढल्या आहे. तर काही संतापलेल्या वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर वेबसाइट डाऊन झाल्याची माहिती दिली.

share market website down pc twitter

Trading Platforms Down: एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी शेअर मार्केटने (Share Market) उंच भरारी घेतल्यानंतर भारतातील प्रमुख ट्रेडींग प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे. अॅप डाऊन झाल्याने वापरकर्त्यांच्या चिंता वाढल्या आहे. तर काही संतापलेल्या वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर वेबसाइट डाऊन झाल्याची माहिती दिली. सीडीएसएल (CDSL) वेबसाइट डाउन आहे. झेरोधा, ग्रोव आणि लोकप्रिय ट्रेडिंग अपस्टॉक्स सेवा डाऊन झाली आहे. ऑनलाईन गुंतवणूकदाराच्या मते, ग्रो आणि झेरोधासारखा लोकप्रिय ट्रेंडिग प्लॅटफॉर्मवर व्यवहार होत नाहीत. (हेही वाचा-  कोटक महिंद्रा बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप डाउन, वापरकर्ते चिंतेत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)