West Bengal: मुर्शिदाबादमध्ये TMC खासदाराच्या गाडीची धडक लागून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
टीएमसी खासदार अबू ताहेर खान त्यांच्या कारमधून जात होते. त्याचवेळी हा चार वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत बँकेत जात होता.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार अबू ताहेर खान यांच्या कारची धडक बसल्याने बुधवारी एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कारने धडक दिल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार अबू ताहेर खान त्यांच्या कारमधून जात होते. त्याचवेळी हा चार वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत बँकेत जात होता. यावेळी खान यांच्या गाडीची मुलाला धडक बसली. मात्र, खासदारांनी सांगितले की, हा मुलगा अचानक त्यांच्या गाडीसमोर आला होता. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सहापूर भागात सरकारी वाहन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
Murshidabad Violence: मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले; SIT कडून चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल
Liquor Ban in Religious Cities: भारतातील प्रमुख 19 धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी लागू; निर्णयाची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी
Advertisement
Advertisement
Advertisement