Lok Sabha Election 2024: 'भेटवस्तूंऐवजी मोदींना मत द्या'! लग्नपत्रिकेवर PM Modi यांचा प्रचार करणे पडले महागात, वधू-वरांवर गुन्हा दाखल

या आवाहनानंतर निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी संनियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे.

लग्नपत्रिका

लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक प्रचाराच्या अनोख्या पद्धती पाहायला मिळतात. सध्या पीएम मोदींसाठी मतदान करण्याबाबतचे एक आवाहन चर्चेत आले आहे. कर्नाटकमध्ये वधू-वराने आपल्या लग्नाच्या कार्डावर पंतप्रधान मोदींना मत देण्याचे आवाहन केले होते. मात्र जेव्हा पोलिसांना या कार्डबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी वधू-वरांविरुद्ध एफआयआर नोंदवला. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत वधू-वरांनी लिहिले होते की, ‘यावेळी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे ही वधू-वरांसाठी भेट असेल, कारण आपला भावी भारत सुरक्षित असावा असे आम्हास वाटते.’ या आवाहनानंतर निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी संनियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे.

याआधी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात असेच एक प्रकरण समोर आले होते, जिथे वराच्या वडिलांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर पाहुण्यांना भेटवस्तू आणण्याऐवजी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्या निमंत्रण पत्रात पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासोबत ‘नरेंद्र मोदींना मतदान करणे हीच सर्वोत्तम भेट असेल’ असे लिहिले होते. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: 400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही - अमित शाह)

पहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)