Violence Erupts Over Mutton Quantity: निजामाबादमध्ये लग्नात मटणाच्या तुकड्यावरून हिंसाचार; वधू-वराच्या नातेवाईकांची एकमेकांना लाठ्या आणि दगडांनी मारहाण (Video)
जेवणात मटणाचे कमी तुकडे वाढले म्हणून शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर भांडणात झाले. हा वाद इतका वाढला की, वधू-वराच्या नातेवाईकांनी एकमेकांवर दगड, लाठ्या मारायला सुरुवात केली.
Violence Erupts Over Mutton Quantity: तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ येथे बुधवारी एका लग्न समारंभात, मटण करीवरून वधू-वराच्या नातेवाईकांमध्ये मोठे भांडण झाले. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत 8 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेबाबत उपनिरीक्षक (एसआय) विनय यांनी सांगितले की, नवीपेठ येथील एका तरुणीचे बुधवारी नंदीपेठ तालुक्यातील तरुणाशी लग्न झाले. हा विवाह सोहळा स्थानिक विवाह हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे वराच्या बाजूने काही तरुणांना मांसाहार देण्यात आला होता. यावेळी जेवणात मटणाचे कमी तुकडे वाढले म्हणून शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर भांडणात झाले. हा वाद इतका वाढला की, वधू-वराच्या नातेवाईकांनी एकमेकांवर दगड, लाठ्या मारायला सुरुवात केली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील सुमारे दीड डझन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसआयने सांगितले. या घटनेत आठ जण जखमी झाले असून, त्यांना निजामाबादच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: Ghaziabad Metro Train Fight: गाझियाबाद मेट्रोमध्ये प्रवाशांमध्ये सीटवरून भांडण, दोघांनी केला एकमेकांवर हल्ला, पुढे काय झाले ते पाहा)
लग्नात मटणाच्या तुकड्यावरून हिंसाचार-
మటన్ కోసం తలలు పగలగొట్టుకున్నారు
నిజామాబాద్ జిల్లా నవీపేట్లో జరిగిన ఓ వివాహ వేడుకలో పెళ్లికొడుకు తరపు వారికి మటన్ తక్కువ వేశారని కర్రలు, రాళ్లతో దాడి చేసుకున్నారు.
దీంతో ఫంక్షన్ హాల్ రణరంగాన్ని తలపించింది. ఈ ఘటనలో పలువురు గాయపడగా పోలీసులు కేసు నమోదు చేసి దర్యాప్తు చేస్తున్నారు. pic.twitter.com/vQsbG02gZU
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2024 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

