Uttarakhand Shocking: विम्याचे 25 लाख मिळावेत म्हणून पतीने केली पत्नीची हत्या; दिले सापाच्या विषाचे इंजक्शन, गुन्हा दाखल

शुभमने 11 ऑगस्ट रोजी सलोनीची हत्या केली होती, तर त्याने 15 जुलै रोजी सलोनीच्या नावावर 25 लाख रुपयांची विमा पॉलिसी काढली होती, ज्यामध्ये त्याने स्वत: ला नॉमिनेट केले होते आणि 2 लाख रुपये प्रीमियम भरला होता.

Snakes | Image Used for representational purpose only । (Photo Credits: Pixabay)

उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमधील जसपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर सापाचे विष देऊन पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. 25 लाखांच्या विमा रकमेचा दावा करता यावा म्हणून आरोपी शुभम चौधरी याने पत्नी सलोनी चौधरीची हत्या केली. या प्रकरणी मृत सलोनी चौधरीचा भाऊ अजित सिंगच्या तक्रारीवरून, शुभम, त्याचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलोनी हिचे लग्न 13 वर्षांपूर्वी जसपूरच्या बधियोवाला येथील शुभम चौधरीशी झाले होते. शुभम गेल्या अनेक वर्षांपासून सलोनीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप अजितने केला आहे. अजितचा दावा आहे की शुभमचे चार वर्षांपूर्वी दुस-या महिलेसोबत अफेअर सुरू होते, त्यामुळे सलोनीने घटस्फोटाची मागणी केली होती.

अजितने आरोप केला आहे की, जसपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ हरेंद्र चौधरी म्हणाले, याबाबत आधी संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु सलोनीच्या मृत्यूचे कारण ‘सापाचे विष’ असल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात पुष्टी झाल्यानंतर, तो हत्येचा गुन्हा म्हणून नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा: Punjab Shocker: गर्भवती पत्नीची हत्या, मृतदेह जाळला; आरोपी पतीला अटक)

पतीने सापाच्या विषाचे इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)