Uttar Pradesh: जौनपूरमध्ये चोरीच्या संशयावरून जमावाने केला तरुणाचा पाठलाग; मुलाने 40 फूट उंचीच्या ओव्हरब्रिजवरून उडी मारून केली आत्महत्या (Watch Video)

एकाला लोकांनी पकडले पण दुसरा ओव्हरब्रिजवर चढला.

Man Jumps to Death After 8-Hour Standoff in Jaunpur (Photo Credit: X/ @Benarasiyaa)

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये मॉब लिंचिंगपासून वाचण्यासाठी एका तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या मुलाने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याचा पाठलाग सुरु केला होता. या जमावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो ओव्हर ब्रिजवर चढला. त्यानंतर लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आल्यानंतरही तरुण खाली आला नाही, त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न केले, मात्र तरुण खाली आला नाही. एकूण आठ तास तो पोलिसांना वर चकमा देत राहिला. त्यानंतर अचानक आलेल्या पावसाने प्रकरण आणखी बिघडवायला सुरुवात केली. पावसामुळे तरुण घसरला आणि सुमारे 100 फूट खाली रस्त्यावर पडला. खाली पडताच त्याचा मृत्यू झाला. आता तरूण घसरला की, त्याने पुलावरून उडी मारली याबाबत स्पष्टता नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अहवालानुसार, लाईन बाजार येथील शिवपार गावात पहाटे ग्रामस्थांनी मूल चोरीच्या संशयावरून दोन तरुणांचा पाठलाग केला. एकाला लोकांनी पकडले पण दुसरा ओव्हरब्रिजवर चढला. प्रथम पकडलेल्या तरुणाला मारहाण केल्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्याला ताब्यात देण्यात आले. (हेही वाचा: Kadapa Shocker: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना)