Uttar Pradesh Shocker: अंधश्रद्धेचा कळस! बुलंदशहरमध्ये 20 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबीयांनी मृतदेह दोरीने बांधून दोन दिवस गंगेत लटकवला (Watch Video)
त्यानंतर कुटुंबीयांनी घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार केले.
Family Hangs Dead Body in Ganges For 2 Days: यूपीच्या बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सर्पदंशामुळे मरण पावलेला तरुण जिवंत होण्याच्या आशेने त्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह दोरीने बांधून गंगेच्या पाण्यात लटकवला. मात्र बराच काळ उलटूनही हा तरुण जिवंत न झाल्याने अखेर दोन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. अंधश्रद्धेच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रशासन मात्र याबाबत काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे.
अहवालानुसार, 26 एप्रिल रोजी 20 वर्षीय मोहित नावाच्या तरुणाचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीय व ग्रामस्थ मोहितचा मृतदेह घेऊन गंगा काठावरील पुलाजवळ पोहोचले. गंगेच्या पाण्यात मृतदेह ठेवल्यास सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होऊन मृत तरुण जिवंत होऊ शकतो, असे त्यांना कुणीतरी सांगितले होते. या आशेने त्यांनी मोहितचा मृतदेह दोरीने बांधून गंगेत लटकवला. दोन दिवस हे शरीर पाण्यात राहिले मात्र मोहित जिवंत झाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Rajasthan Shocker: कोटामध्ये रील बनवण्याची क्रेझ ठरली जीवघेणी; बंदुकीसह व्हिडिओ शूट करताना तरुणाचा मृत्यू)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)