UPI for Secondary Market: शेअर बाजारात युपीआय आणणार क्रांती! सेकंडरी मार्केटसाठी बीटा चाचणी 1 जानेवारीपासून होणार सुरू
सुरुवातीला ही सुविधा पायलट ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पारंपारिक पेमेंट पद्धतींची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दुय्यम बाजारात (Secondary Market) ASBA सारखी सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 'यूपीआय फॉर सेकंडरी मार्केट' (UPI for Secondary Market) हा उपक्रम पुढील वर्षापासून सुरु होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे येत्या 1 जानेवारी 2024 पासून, भारतीय इक्विटी कॅश विभागामध्ये एक महत्त्वपूर्ण विकास घडणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच्या बीटा टप्प्यात 'यूपीआय फॉर सेकंडरी मार्केट' व्यवहार सुरू करत आहे. हा उपक्रम शेअर बाजारातील व्यवहार सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहे. व्यापारी आणि गुंतवणूकदार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा वापर स्टॉक एक्सचेंजच्या रोख विभागातील समभाग खरेदी आणि विक्रीसाठी करू शकतील.
सुरुवातीला ही सुविधा पायलट ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पारंपारिक पेमेंट पद्धतींची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे. यासाठी एनपीसीआयने पेमेंट अॅप्सना 31 डिसेंबरपर्यंत एक वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय असलेले युपीआय आयडी (UPI ID) निष्क्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: नवीन वर्षाची भेट! बचत योजनांच्या व्याजदरात बदल, Sukanya Samriddhi Scheme चा व्याज 0.20% ने वाढला)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)