UP Shocker: बाळ नको म्हणून तरूणीला थेट ॲसिड पाजलं, पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू; उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील घटना
उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे एका तरुणीवर काही दिवसांपूर्वी बलात्कार झाला. त्यानंतर तरूणी गरोदर राहिली. बाळ नको म्हणून तरूणीला ॲसिड पाजून जीवे मारण्यात आले आहे.
UP Shocker: या प्रकरणात नराधमाने सुरूवातीला तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर, तरूणीच्या ईच्छे विरुद्ध तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान, तरूणी गरोदर झाली. बाळ नको म्हणून आरोपीने तिला औषधे घेण्यासाठी फोर्स केले. त्याला तरूणीने नकार दर्शवला. त्यामुळे अखेर तरूणाने रागात तिला थेट ॲसिड(acid) पाजले. परिणामी तरूणी गंभीर जखमी झाली. तिला लखनऊच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारा(treatment)दरम्यान पीडितेचा मृत्यू (Death) झाला. हे प्रकरण पीलीभीतच्या पुरनपूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (हेही वाचा :Dombivali Crime: डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Virar Shocker: विरार मध्ये 21 व्या मजल्यावरून 7 महिन्याच्या बाळाचा पडून मृत्यू
Varanasi Gangrape Case खोटी? लैंगिक अत्याचार प्रकरणातील तक्रारदार त्या दिवसांमध्ये सोशल मीडियावरील फोटोंमध्ये हसताना, फिरताना दिसली
Advertisement
Advertisement