उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. महत्वाचे म्हणजे बलात्कारानंतर या नराधमांनी पीडितेला कपड्यांशिवाय त्या ठिकाणाहून हाकलून दिले. या अल्पवयीन मुलीने कपड्यांशिवाय रस्त्यावरून चालत आपले घर गाठले आणि कुटुंबियांना घडलेली हकीकत सांगितली. मुरादाबाद गँगरेपचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पीडित मुलगी कपड्यांशिवाय रस्त्यावरून रडत चालताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. मुरादाबाद सामूहिक बलात्काराची ही घटना 1 सप्टेंबरची असून, उत्तर प्रदेश पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, 15 वर्षीय पीडित मुलगी 1 सप्टेंबर रोजी तिच्या 7 मित्रांसह गावातील जत्रेला भेट देण्यासाठी गेली होती. जिथे गावातील 5 तरुणांनी तिचे अपहरण करून तिला दुचाकीवर सैदपूर खद्दरच्या जंगलात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला विवस्त्र अवस्थेत तेथून हाकलून दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)