केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना Covid 19 ची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन

सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु असून, यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना विषाणूची लागण झाली आहे

Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु असून, यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना विषाणूची लागण झाली आहे. आता माहिती मिळत आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. गडकरी यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'आज माझी कोरोनाची चाचणी सकारात्मक आली. मला सौम्य लक्षणे आहेत. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला वेगळे ठेवावे आणि चाचणी करून घ्यावी.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement