Umesh Pal Murder Case: उमेश पाल हत्याकांडात आणखी एक एनकाउंटर, पहिली गोली मारणारा उस्मान एनकाऊंटरमध्ये ठार

आरोपी विजय उर्फ ​​उस्मान याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते.

प्रयागराजच्या (Prayagraj) कौंधियारा पोलीस स्टेशन परिसरात आज सकाळी गुन्हे शाखेचे पथक आणि आरोपी विजय उर्फ ​​उस्मान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत (Encounter) उस्मानला गोळी लागली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. उस्मान चौधरीने उमेश पाल (Umesh Pal Murder Case) आणि हवालदारावर आधी गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी विजय उर्फ ​​उस्मान याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now