Ukraine-Russia Crisis: युक्रेनची विनंती केली मान्य; पीएम नरेंद्र मोदी आज रात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलणार

राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलण्याची विनंती केली आहे

व्लादिमिर पुतीन आणि नरेंद्र मोदी (Photo Credits-ANI)

युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलण्याची विनंती केली आहे. यावेळी भारत हा एक शक्तिशाली जागतिक खेळाडू बनला असून, भारताने युद्धाच्या मुद्द्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत, अशा परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांचे नक्कीच ऐकतील याची आम्हाला खात्री आहे.

त्यानंतर आता माहिती मिळत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement