Tripura: कुमारघाट येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का बसून 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी
मिरवणुकीदरम्यान, 'रथ' अनावधानाने ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून अनेक लोकांचा मृत्यू झाला. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.
त्रिपुराच्या कुमारघाटमध्ये भगवान जगन्नाथच्या 'उलटा रथयात्रा' उत्सवादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी हा रथ एका हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आला, परिणामी भीषण आग लागली. हा अपघात दुपारी 4.30 च्या सुमारास झाला, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. अहवालानुसार, हा उत्सव रथयात्रेच्या एका आठवड्यानंतर, भगवान बलदेव, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या घरी परतण्याचे प्रतीक आहे. या जल्लोषाच्या वातावरणात, लोखंडापासून तयार केलेला 'रथ' ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते. दुर्दैवाने, मिरवणुकीदरम्यान, 'रथ' अनावधानाने ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून अनेक लोकांचा मृत्यू झाला. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा: सहारनपूरमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्यावर प्राणघातक हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, थोडक्यात बचावले भीम आर्मी प्रमुख)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)