Trichy Shocker: पाचवी गर्भधारणा टाळण्यासाठी घेतल्या गर्भपाताच्या गोळ्या; 4 मुलांच्या आईचा मृत्यू
गोळ्या घेतल्यानंतर तिला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी गावात तिच्या बहिणीच्या घरी गेली. तिथे तिची तब्येत अजूनच बिघडली.
Women Dies After Taking Abortion Pills: तामिळनाडूच्या त्रिची येथे शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने एका चार मुलांची आईचा दुःखद मृत्यू झाला. या गोळ्यांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतर 34 वर्षीय महिलेला तातडीने महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. ही तिची पाचवी गर्भधारणा होती. थुवरनकुरीची पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की, तिरुवल्लूर येथील महिलेचे लग्न 15 वर्षे झाले होते आणि तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर तिने एका फार्मसीमधून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या आणि 22 ऑगस्ट रोजी डॉक्टरांशी सल्लामसलत न करता त्या खाल्ल्या.
त्यानंतर तिला थुवरंकुरीची येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतरही, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, आणि त्यानंतर तिला महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात (MGMGH) रेफर करण्यात आले, जिथे तिचे दुःखद निधन झाले. (हेही वाचा; Bijapur Video: गर्भवती महिलेला खाटेवर बसवून रुग्णालयात नेले, लोकांनी जीव धोक्यात घालून केली नदी पार, पाहा व्हिडीओ)
गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर महिलेचा मृत्यू-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)