Mahua Moitra on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील भारतीयांचा विश्वास उडला- महुआ मोइत्रा

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावरील देशवासीयांचा विश्वास केव्हाच उडाला आहे. नवीन संसदेच्या दालनात बहुसंख्य असलेल्या धर्मगुरूंपुढे नतमस्तक होण्याचा महान लोकशाहीचा पंतप्रधानांचा तमाशा आपल्याला लाजवेल.

Mahua Moitra (Photo Credit - Twitter/ANI)

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावरील देशवासीयांचा विश्वास केव्हाच उडाला आहे. नवीन संसदेच्या दालनात बहुसंख्य असलेल्या धर्मगुरूंपुढे नतमस्तक होण्याचा महान लोकशाहीचा पंतप्रधानांचा तमाशा आपल्याला लाजवेल. त्याच वेळी महिला पैलवानांविरुद्ध पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि मारहाण इतिहासात नेहमीच आम्हाला अपमानीत करत राहिली, असा घणाघात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार महुआ मोइत्रा यांनी केला आहे. विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी त्या लोकसभेमध्ये बोलत होत्या.

TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, हरियाणातील 3 जिल्ह्यांतील 50 पंचायतींनी मुस्लिम व्यापाऱ्यांना राज्यात प्रवेश करण्यास मनाई करणारी पत्रे जारी केली आहेत. 'नफ्रतो की जंग में अब देखो क्या क्या हो गया, सब्जिया हिंदू हुई और बकरा मुस्लिम हो गया'. प्रत्येकजण विचारतो की मोदीजी नाही तर कोण? मणिपूरच्या या निष्क्रियतेनंतर, कोणीही म्हणेल मोदींशिवाय भारत.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now