Dance Before Theft: पंजाबमध्ये कुलूप तोडून चोरट्यांना लाखोंचा ऐवज चोरला; चोरी पुर्वी केला भांगडा

चोरी करत असताना चोर भांगडा नृत्य करत असल्याचे दिसत आहे.

पंजाब (Punjab) फिरोजपूर रोडवर असलेल्या ब्युटी अॅकॅडमीचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला. होळीच्या (Holi) दिवशी 8 मार्चच्या पहाटे चोरट्यांनी हा गुन्हा केला. 9 मार्च रोजी केंद्राचे कर्मचारी कामावर पोहोचले असता त्यांना कुलूप तुटलेले दिसले असता त्यांनी अकादमीच्या व्यवस्थापकाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाणे विभाग क्रमांक 5 चे पोलीस घटनास्थळी पोहोचले. संबधीत चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असून चोरी करत असताना चोर भांगडा नृत्य करत असल्याचे दिसत आहे. मॅनेजर हरप्रीत कौर यांनी सांगितले की त्यांच्या इंटरनॅशनल ब्युटी अकादमी सेंटरमध्ये मुलांना ब्युटी टिप्सशी संबंधित पदवी आणि डिप्लोमा दिला जातो.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now