Charminar Express Derails: तेलंगणा मध्ये Nampally रेल्वेस्थानकाजवळ चारमिनार एक्सप्रेसला अपघात; डब्बा रूळावरून घसरल्याने 5 जण जखमी
नामपल्ली रेल्वे स्थानकामध्ये चारमिनार एक्सप्रेसच्या दरवाज्यात उतरण्यासाठी उभे असलेले पाच जण जखमी झाले आहेत.
तेलंगणा मध्ये Nampally रेल्वेस्थानकाजवळ चारमिनार एक्सप्रेसचे 3 डब्बे घसरल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. दरम्यान Nampally हे अंतिम स्थानक होते. ट्रेन थांब्याच्या थोडी पुढे गेली आणि ड्ब्बे घसरले. त्यामुळे दरवाज्यात उतरण्यासाठी उभे असलेले पाच जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे सीपीआरओ राकेश यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)