Swati Maliwal-Bibhav Kumar Fight Video: आप खासदार स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्यात जोरदार वादावादी; समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Watch)
आप खासदार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्यातील भांडणाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये स्वाती मालीवाल कर्मचाऱ्यांसोबत जोरदार वाद घालताना दिसत आहेत.
Swati Maliwal-Bibhav Kumar Fight Video: दिल्लीच्या आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. लेटेस्टली मराठीने या व्हिडिओला दुजोरा दिला नसला तरी, हा व्हिडिओ सीएम हाऊसच्या आतील असल्याचे सांगण्यात येत आहे. आप खासदार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्यातील भांडणाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये स्वाती मालीवाल कर्मचाऱ्यांसोबत जोरदार वाद घालताना दिसत आहेत. कर्मचारी स्वाती मालीवाल यांना घराबाहेर जाण्यास सांगत आहेत, तर दुसरीकडे स्वाती प्रचंड संतापल्या आहेत. व्हिडिओमध्ये, त्या वारंवार पोलिसांना कॉल करण्याची धमकी देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून पोलिसांनी त्याला अद्याप दुजोरा दिला नाही. (हेही वाचा: Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल यांच्या चेहऱ्यावर अंतर्गत जखमा; 3 तास चाललेल्या वैद्यकीय चाचणीत खुलासा)
पहा व्हिडिओ-
स्वाती मालीवाल यांची प्रतिक्रिया-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)