Suspicious Bag Found Near RG Kar Medical College: कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलजवळ आंदोलनस्थळी सापडली संशयास्पद बॅग; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्ब निकामी पथक बॅगची तपासणी करत आहे.

Suspicious Bag Found Near RG Kar Medical College (फोटो सौजन्य - ANI)

Suspicious Bag Found Near RG Kar Medical College: कोलकाता येथील आरजी कार कॉलेज आणि हॉस्पिटलजवळ एक संशयास्पद बॅग सापडली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हत्येप्रकरणी डॉक्टर ज्या ठिकाणी आंदोलन करत होते त्याच ठिकाणी ही संशयास्पद बॅग सापडली. श्वानपथक तसेच बॉम्बशोधक पथक आंदोलनस्थळी पोहोचले आहे. ही संशयित बॅग आंदोलकांच्या निषेध मंचाजवळ सापडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूंचा पुरावा मिळालेला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्ब निकामी पथक बॅगची तपासणी करत आहे.

9 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या आवारात एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर हे रुग्णालय चर्चेत आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टर पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

आरजी कार हॉस्पिटलजवळ आंदोलनस्थळी सापडली संशयास्पद बॅग, पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)