Surat Accident: सुरतमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान क्रेन उलटली; दोन जण जखमी (Watch)

हा अपघात एवढा भीषण होता की, क्रेनने जोरात धडक दिल्याने पिता-पुत्र दुचाकीसह सुमारे 20 फूट फेकले गेले. ज्यामध्ये त्यांची दुचाकीही क्रेनखाली आली. सध्या क्रेन चालकाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात आली आहे.

Surat Accident

सध्या गुजरातच्या सुरतमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे कामकाज चालू आहे. अशात काही भागात अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. आज सुरतमधील चौक बाजार परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेनच्या चालकाने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिता-पुत्रांना धडक दिली. त्यानंतर क्रेन उलटली. या घटनेनंतर परिसरात गदारोळ माजला. उपस्थित लोकांनी क्रेन चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर जखमी मुलगा आणि त्याच्या वडिलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रेन उलटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, क्रेनने जोरात धडक दिल्याने पिता-पुत्र दुचाकीसह सुमारे 20 फूट फेकले गेले. ज्यामध्ये त्यांची दुचाकीही क्रेनखाली आली. सध्या क्रेन चालकाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा: Bank Robbery Video: सूरत शहरात बंदुकीचा धाक दाखवत 13 लाखांचा दरोडा, व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now