Student Suicide In Kota: कोचिंग हब कोटा येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, दोन आठवड्यातील तिसरा मृत्यू

विद्यार्थ्याने बुधवारी केव्हातरी हे टोकाचे पाऊल उचलले, मात्र गुरुवारी रात्री विज्ञान नगर परिसरात असलेल्या पीजी येथील खोलीत त्याचा मृतदेह सापडला. कोटा येथे दोन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Student Suicide In Kota: राजस्थानमधील कोटा येथे बी.टेकच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या पीजी (पेइंग गेस्ट) खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, नूर मोहम्मद (27) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. माहितीनुसार, विद्यार्थ्याने बुधवारी केव्हातरी हे टोकाचे पाऊल उचलले, मात्र गुरुवारी रात्री विज्ञान नगर परिसरात असलेल्या पीजी येथील खोलीत त्याचा मृतदेह सापडला. कोटा येथे दोन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी असलेला मोहम्मद चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होता आणि कोटा येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. मोहम्मदने 2016 ते 2019 या कालावधीत प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटामधील कोचिंग संस्थांमध्ये शिक्षण घेतले आणि एसआरएम विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तो कोटा येथील पीजीमधून ऑनलाइन वर्ग घेत होता. (हेही वाचा: Lucknow Shocker: मलिहाबादमध्ये तिहेरी हत्याकांड; जमिनीच्या वादातून तिघांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement