Stampede-Like Situation In Sadar Bazar: दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी; दिल्लीच्या सदर बाजारात चेंगराचेंगरीसारखी स्थिती, पहा भयावह व्हिडीओ (Watch)
रस्त्यावर उभ्या असलेल्या विक्रेत्यांनीही रस्ता अडवला, त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी फारच कमी जागा राहिली.
Stampede-Like Situation In Sadar Bazar: सध्या देशात सर्वत्र दिवाळीची लगबग सुरु आह्रे. बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. अशात दिवाळीपूर्वी खरेदीसाठी आलेल्या लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे दिल्लीच्या गजबजलेल्या सदर बाजारामध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. बुधवारी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये लोक गजबजलेल्या बाजारात जागेसाठी धडपडताना दिसत आहेत. तसेच काही लोक डोक्यावर पिशव्या ठेवून गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या विक्रेत्यांनीही रस्ता अडवला, त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी फारच कमी जागा राहिली. अत्यंत भयावह असा हा व्हिडीओ नक्कीच अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडिओ मुळात कधी रेकॉर्ड करण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बाजारपेठेत पथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सणांच्या काळात सदर बाजारात मोठी गर्दी असते. आम्ही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची योजना आखत आहोत आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच जिल्हा दंडाधिकारी, मार्केट असोसिएशन आणि एमसीडी (दिल्ली महानगरपालिका) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत. (हेही वाचा: Gold Price Today: दिवाळीच्या आधी सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक; दिल्लीत 78,900 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव)
Stampede-Like Situation In Sadar Bazar:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)