राजधानी दिल्लीत चाकूने वार करून हत्या झाल्याची आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय पोलीस स्टेशन हद्दीतील राजू पार्क परिसरात एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. येथे तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी लावण्यात आलेला सीसीटीव्हीद्वारे ही घटना उघडकीस आली. फुटेजमध्ये दोघे जण एका तरुणावर चाकूने वार करताना दिसत आहेत. मृत तरुणाची ओळख पटली आहे. सचिन असे त्याचे नाव असून तो राजू पार्क परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची नोंद केली आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा: दुचाकीवर स्टंट करताना अपघात, पोलिसांकडून गुन्हा दाखल, दोघांना अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)