Jawans Push Train Video: जवानांना धक्का मारून ट्रेन का चालवावी लागली? South Central Railway हे केला वायरल व्हिडिओ वर खुलासा; 'हे' होतं त्यामागील खरं कारण

ट्रेनला लागलेल्या आगीमध्ये मागच्या डब्ब्याचं नुकसान टाळण्यासाठी इंजिनच्या मदतीची वाट न पाहता ही आपत्कालीन कारवाई केल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

South Central Railway | Twitter

सोशल मीडीयामध्ये सध्या एक व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे ज्यात काही पोलिस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी एका रेल्वेच्या डब्ब्याने धक्का मारून रूळावर चालवत असल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडीयावर या व्हिडिओ वरून युजर्सने अनेक उलट सुलट चर्चा केल्या आहेत. त्यानंतर South Central Railway ने त्याबाबतचा खुलासा ट्वीटर वर केला आहे. ही घटना 7 जुलैची Tr No 12703 (HWH-SC)सोबतची आहे. या ट्रेनला आग लागली होती, ती अधिक पसरू नये म्हणून इंजिनशी वाट न बघता मागील डबे वेगळे करण्याच्या प्रयत्न सार्‍यांनी केला. त्यासाठी रेल्वे कर्मचारी, स्थानिक पोलिस हातभार लावत असल्याचं South Central Railway ने म्हटलं आहे.

पहा खुलासा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now