Silkyara Tunnel First Inside Video: बोगद्यात अडकलेल्या कामगारांनी आत रेकॉर्ड केला होता व्हिडिओ; पहा अशा परिस्थितीमध्ये दिली मृत्यूशी झुंज (Watch)
या व्हिडिओवरून आपण कल्पनाही करू शकत नाही, की हे कामगार तब्बल 17 दिवस या ठिकाणी कसे राहिले असतील. 28 नोव्हेंबर रोजी त्यांची सुटका करण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे.
Silkyara Tunnel First Inside Video: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सिल्क्यरा बोगद्यात सुमारे 17 दिवस अडकलेल्या सर्व 41 कामगारांची मंगळवारी संध्याकाळी विविध यंत्रणांच्या संयुक्त बचाव मोहिमेचा भाग म्हणून सुटका करण्यात आली. या सर्व कामगारांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. कामगार बाहेर आल्यानंतर आता ते बोगद्यात ज्या ठिकाणी अडकले होते तिथला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओवरून आपण कल्पनाही करू शकत नाही, की हे कामगार तब्बल 17 दिवस या ठिकाणी कसे राहिले असतील. 28 नोव्हेंबर रोजी त्यांची सुटका करण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. 12 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधण्यात येत असलेल्या सिल्कियारा बोगद्यात ढिगारा कोसळल्याने 41 कामगार आत अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच अनेक संस्थांनी संयुक्त बचाव मोहीम राबवली. (हेही वाचा: DAC Approved Defence Equipment: शत्रूची आता खैर नाही! IAF ची ताकद वाढणार, डीएसीने दिली 97 Tejas आणि 150 Prachand Helicopters खरेदीला मान्यता)
बोगद्यात अशा अवस्थेमध्ये कामगारांनी काढले 17 दिवस-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)