Shahjahanpur Horror: उत्तर प्रदेशमध्ये नातवाने केला वृद्ध आजीवर बलात्कार; दिली तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

कुमार याच्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

Elderly Grandmother Raped by Grandson: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या खुटारमधून आजी आणि नातू यांचे नाते आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक बातमी समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या आजीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनोज कुमार अवस्थी म्हणाले, गुरुवारी रात्री वृद्ध महिला घरात झोपली होती तेव्हा तिचा नातू अखिलेश कुमारने कथितपणे तिला आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. अधिकाऱ्याने सांगितले की, कुमारने या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास आजीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

कुमार याच्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. राज्यात आपल्याच लोकांकडून महिला आणि मुलींवर अत्याचाराची ही पहिलीच घटना नाही, तर दररोज अशा अनेक घटना समोर येत आहेत. (हेही वाचा: UP Shocker: उत्तर प्रदेशात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पोलिसांकडून कारवाई)

नातवाने केला वृद्ध आजीवर बलात्कार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now