Sexual Harassment Complaints in FY24: आर्थिक वर्षे 2024 मध्ये शीर्ष भारतीय कंपन्यांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी 40% वाढल्या; बँकिंग आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ

आकडेवारीनुसार, बीएसइ (BSE) 30 कंपन्यांनी आर्थिक वर्षे 2024 मध्ये एकत्रितपणे 932 तक्रारी नोंदवल्या, ज्या आर्थिक वर्षे 2023 मध्ये 664 होत्या. सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून आल्या आहेत.

Sexual harassment Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

Sexual Harassment Complaints in FY24: गेल्या काही दिवसांत संपूर्ण देश महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी ढवळून निघाला आहे. दररोज महिला-मुलींच्या शारीरक शोषणाच्या घटना समोर येत आहेत. आता कॉर्पोरेट विश्वातही अशा घटना वाढल्याचे दिसत आहे. भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आर्थिक वर्षे 2024 मध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये 40% वाढ झाली आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, Complykaro ने संकलित केलेल्या डेटामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये एकूण 40.4 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 268 अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आकडेवारीनुसार, बीएसइ (BSE) 30 कंपन्यांनी आर्थिक वर्षे 2024 मध्ये एकत्रितपणे 932 तक्रारी नोंदवल्या, ज्या आर्थिक वर्षे 2023 मध्ये 664 होत्या. सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून आल्या आहेत. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक)

शीर्ष भारतीय कंपन्यांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी 40% वाढल्या-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now