Sexual Harassment Case: 'शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला फुले स्वीकारण्यास भाग पाडणे म्हणजे लैंगिक छळ'- Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला फुले भेट देणे आणि इतरांसमोर ती स्वीकारण्यासाठी मुलीवर दबाव आणणे ही बाब लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत लैंगिक छळ आहे.

Supreme Court

Sexual Harassment Case: सावध रहा, जर तुम्ही एखाद्या मुलीला जबरदस्तीने फुले देण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. हे आम्ही नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला फुले भेट देणे आणि इतरांसमोर ती स्वीकारण्यासाठी मुलीवर दबाव आणणे ही बाब लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत लैंगिक छळ आहे. मात्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी शिक्षकाची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने म्हटले की, या ठिकाणी एका शिक्षकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन पुराव्याची काटेकोरपणे छाननी करण्याची गरज आहे. न्यायालयाने पुराव्याची काटेकोरपणे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निकालात, न्यायालयाने तामिळनाडू ट्रायल कोर्ट आणि मद्रास उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द केली, ज्याने शिक्षकाला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. (हेही वाचा: Live-In Relationship: 'जोडीदाराला घटस्फोट न देता दुसऱ्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे बेकायदेशीर'; उच्च न्यायालयाने फेटाळली महिलेची संरक्षण याचिका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now