Sexual Assault: पीडितेच्या खाजगी भागाला लिंगाने स्पर्श करणे हा पॉक्सो कायद्यानुसार गंभीर लैंगिक अत्याचार; Meghalaya High Court चा मोठा निर्णय

या प्रकरणात न्यालयाने आरोपीला लैंगिक अत्याचारासाठी दोषी ठरवले आणि त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीला 4 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

कोर्ट । ANI

Sexual Assault: अलीकडेच, मेघालय उच्च न्यायालयाने नोंदवले की, अल्पवयीन पीडितेच्या गुप्तांगांना पुरुषाचे जननेंद्रिय स्पर्श करणे हा गंभीर लैंगिक छळाचा गुन्हा आहे, जो पॉक्सो (POCSO) कायदा 2012 च्या कलम 6 अंतर्गत दंडनीय आहे. न्यायालयाने नमूद केले की, योनीमध्ये प्रवेश न करता पीडितेच्या खाजगी भागाला आपल्या लिंगाने स्पर्श करणे हे आरोपीचे कृत्य, गंभीर लैंगिक छळ (पॉक्सो कायद्याच्या कलम 7 अंतर्गत) आहे. योनीमध्ये लिंग प्रवेश न झाल्याने केवळ पॉक्सो कायद्याच्या कलम 7 अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला  जावा, असा बचाव आरोपीने घेतला होता. मात्र न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावत सांगितले की, पीडितेच्या खाजगी भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे ही कृती देखील लैंगिक अत्याचाराखाली येऊ शकते.

या प्रकरणात न्यालयाने आरोपीला लैंगिक अत्याचारासाठी दोषी ठरवले आणि त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीला 4 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. (हेही वाचा: Andhra Pradesh Horror: दारूच्या नशेत मामाचा 6 महिन्यांच्या भाचीवर बलात्कार, आरोपी अटकेत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now