Sexual Assault on Minor Student: टीडी कॉलेजच्या प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर केले लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल, आरोपीला अटक

अल्पवयीन विद्यार्थी प्रोफेसर संतोष सिंह याच्या घरी पुस्तक घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रोफेसरने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Arrested | (File Image)

टिलकधारी महाविद्यालय (टीडी कॉलेज) ही शिक्षण क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. इथे गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांच्या गैरकृत्यांच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच एका प्राध्यापकाचा एका विद्यार्थिनीसोबत अश्लील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात आता महाविद्यालयातील पिली कोठी येथील विधी शाखेच्या प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. अल्पवयीन विद्यार्थी प्रोफेसर संतोष सिंह याच्या घरी पुस्तक घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रोफेसरने त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याने कसातरी आपला जीव वाचवला. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्राध्यापकाला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा: Miscreants Misbehave With Couple Video: लज्जास्पद! बिहारच्या गयामध्ये प्रेमी जोडप्यासोबत गैरवर्तन; तरुणीसोबत केले अश्लिल कृत्य)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement