Revised Timings of Mumbai Division Trains: पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेससह मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या; जाणून घ्या नवे वेळापत्रक

हे बदल 24-26 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील. मध्य रेल्वेने प्रवाशांनी या बदलांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे.

Revised Timings of Mumbai Division Trains: पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेससह मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या; जाणून घ्या नवे वेळापत्रक
Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Revised Timings of Mumbai Division Trains: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने वक्तशीरपणा आणि स्ट्रीम लाइनिंग ऑपरेशन्स सुधारण्यासाठी, त्यांच्या अधिकारक्षेत्रात चालणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळेत बदल जाहीर केले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसटीच्या मार्गावरील तीन महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर या बदलाचा परिणाम होणार आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक 11008 पुणे-सीएसएमटी मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (दैनिक), ट्रेन क्रमांक 16352 नागरकोइल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक), ट्रेन क्रमांक 16340 नागरकोइल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (आठवड्यातून चार वेळा), ट्रेन क्रमांक 16332 तिरुवनंतपुरम-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (साप्ताहिक) या गाड्यांचा समावेश आहे. हे बदल 24-26 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील. मध्य रेल्वेने प्रवाशांनी या बदलांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे. (हेही वाचा: Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशाला जेवणात आढळला झुरळ, तक्रार दाखल)

मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2024 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).