Anant Ambani at Kashi Vishwanath Temple: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली
वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी मनोभावे पूजा केली. पूजा संपताच पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.
अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी मंगळवारी काशी विश्वनाथ दरबारात हजेरी लावली. वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी मनोभावे पूजा केली. पूजा संपताच पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी अनंत अंबानी हे मंगळवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी पूजा करुन आशीर्वाद घेतले. अनंत अंबानी यांचा नुकताच विवाह झाला आहे. त्यांनी विरेन मर्चेंट यांची कन्या राधिका मर्चेंट यांच्याशी विवाह केला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)