RBI चा मोठा निर्णय- Paytm Payments Bank ला नवीन ग्राहक ऑनबोर्ड करण्यावर घातली बंदी

ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर तात्काळ नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. बँकेला त्यांच्या आयटी (IT) प्रणालीचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई बँकेत आढळलेल्या काही मटेरीअल पर्यवेक्षकीय समस्यांवर आधारित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडद्वारे नवीन ग्राहकांचे ऑनबोर्डिंग हे, आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर आरबीआयद्वारे मंजूर केलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन असेल, असे सेंट्रल बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement