राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) अमृत उद्यान (Amrit Udyan) 2 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीचा सोमवार हा वार वगळता, आठवड्यातील इतर वारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान 5 फेब्रुवारी (दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे), 20 आणि 21 फेब्रुवारी (राष्ट्रपती भवनातील अभ्यागत परिषदेमुळे) आणि 14 मार्च (होळीमुळे) बंद राहील. भेट देणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश आणि निर्गमन प्रेसिडेंट्स इस्टेटच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून होईल, जे नॉर्थ अॅव्हेन्यूपासून राष्ट्रपती भवनाच्या जवळ आहे. अभ्यागतांच्या सोयीसाठी, सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार क्रमांक 35 दरम्यान शटल बस सेवा दर 30 मिनिटांनी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. (हेही वाचा: Wedding At Rashtrapati Bhavan: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला सीआरपीएफ अधिकारी Poonam Gupta डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत बांधणार लग्नगाठ)
अमृत उद्यान पुढील दिवशी विशेष श्रेणींसाठी खुले राहील:
26 मार्च- दिव्यांग व्यक्तींसाठी
27 मार्च- संरक्षण, निमलष्करी आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी
28 मार्च- महिला आणि आदिवासी महिला स्वयंसहायता गटांसाठी
29 मार्च- ज्येष्ठ नागरिकांसाठी
उद्यानासाठी नोंदणी आणि प्रवेश विनामूल्य आहे.
नोंदणी https://visit.rashtrapatibhavan.gov.in/.येथे करता येईल. आयत्या वेळेस प्रवेशही मिळू शकेल. यासह ष्ट्रपती भवनात 6 ते 9 मार्च 2025 दरम्यान 'विविधता का अमृत महोत्सव'आयोजित केला जाणार आहे. या वर्षीच्या महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडेल.
Rashtrapati Bhavan Amrit Udyan:
Amrit Udyan To Open For Public From February 2: Check Timing, Slots To Visit https://t.co/n58CFNNmzs pic.twitter.com/fIjMneCtPN
— NDTV (@ndtv) January 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)