Rape and Breakup Case: केवळ ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही; Supreme Court चा मोठा निर्णय

नागरथना आणि एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा खटला फेटाळून लावला. तरुणाचे मुलीशी दीर्घकालीन नाते आणि शारीरिक संबंध होते, याचा अर्थ मुलीचीही त्याला संमती होती, असे न्यायालयाने मानले.

Supreme Court

Rape and Breakup Case: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा खटला फेटाळून लावत म्हटले की, सहमतीने संबंध असलेल्या जोडप्यामधील नाते तुटल्याने गुन्हेगारी कारवाईला चालना मिळू शकत नाही. माहितीनुसार, 2019 मध्ये या तरुणीने, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तरूणाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा खटला फेटाळून लावला. तरुणाचे मुलीशी दीर्घकालीन नाते आणि शारीरिक संबंध होते, याचा अर्थ मुलीचीही त्याला संमती होती, असे न्यायालयाने मानले. न्यायालयाने म्हटले आहे की, ‘जोडप्यांमधील सहमतीपूर्ण नातेसंबंध तुटले म्हणून फौजदारी कारवाई सुरू करता येणार नाही. पक्षांमध्ये सहमतीपूर्ण संबंध असतील आणि या संबंधाचा परिणाम वैवाहिक संबंधात होत नाही म्हणून, त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुन्हेगारीचा रंग दिला जाऊ शकत नाही.’

लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पुरुषाविरुद्धचा खटला फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की, ‘स्वैच्छिक संमती नसताना तक्रारदार अपीलकर्त्याला भेटत राहिला किंवा तिच्या दीर्घकालीन संबंध ठेवले हे अकल्पनीय आहे. म्हणजेच या संबंधांना मुलीची संमती होते असे दिसते. आता ब्रेकअप झाल्यानंतर मुलाविरुद्ध बलात्काराचा खातालां चावला जाऊ शकत नाही.’ (हेही वाचा: भावजयीद्वारे केलेले बॉडी शेमिंग हे स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे वर्तन, आयपीसी कलम 498A अंतर्गत क्रूरता- Kerala High Court)

केवळ ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)