Ram Rahim Cuts Cake with Sword: राम रहीमने तलवारीने कापला केक; साजरा केला पॅरोल मिळाल्याचा आनंद (Watch Video)

एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राम रहीमने 40 दिवसांचा पॅरोल मागण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी राम रहीमला ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते.

गुरमीत राम रहीम (Photo Credits Social Media)

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम तलवारीने केक कापून स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना दिसला आहे. कोर्टातून 40 दिवसांचा पॅरोल मिळाल्यानंतर राम रहीम शनिवारी बागपतमधील त्याच्या बर्नवा आश्रमात पोहोचला. तिथे त्याने तलवारीने केक कापला. बलात्कार आणि हत्येप्रकरणी तो रोहतकच्या सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे. डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाने पॅरोलदरम्यान केक कापल्याच्या व्हायरल व्हिडिओने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या या उत्सवात अनेक अनुयायी सामील झाले होते. शस्त्रास्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन म्हणजेच तलवारीने केक कापण्यास शस्त्र कायद्यानुसार बंदी आहे.

एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राम रहीमने 40 दिवसांचा पॅरोल मागण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी राम रहीमला ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. हरियाणा पंचायत निवडणूक आणि आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच त्याला पॅरोल देण्यात आला होता. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement