Rajasthan: कोटा येथे रामनवमी उत्सवादरम्यान स्टंट करताना मोठा अपघात; विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू

यात जखमींचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रामनवमीची मिरवणूक काढली जात असताना तिघांनी विजेच्या तारेला स्पर्श केला.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

कोटाच्या कोटरा येथील रामनवमीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारेला स्पर्श होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, या घटनेत अर्धा डझन लोक गंभीररीत्या भाजले आहेत. ही घटना कोटाच्या सुलतानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटरा ​​दीपसिंग गावातील आहे. यात जखमींचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रामनवमीची मिरवणूक काढली जात असताना तिघांनी विजेच्या तारेला स्पर्श केला. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now