Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या दोन फायली ओडिशाच्या कायदा विभागात गहाळ

विभागाच्या उपसचिवांनी त्या दोन फायली प्राधान्याने शोधण्यासाठी त्याअंतर्गत असलेल्या सर्व विभागांना पत्र दिल्याने ही घटना समोर आली आहे.

Puri Jagannath Temple

पुरी जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (जेटीए) दोन फायली ओडिशाच्या कायदा विभागात गहाळ झाल्या आहेत. विभागाच्या उपसचिवांनी त्या दोन फायली प्राधान्याने शोधण्यासाठी त्याअंतर्गत असलेल्या सर्व विभागांना पत्र दिल्याने ही घटना समोर आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी या फायली वापरल्या जातील.

विभागाच्या पत्रात असे लिहिले आहे की, 'जेटीए सेक्शनच्या दोन फाईल्स- क्रमांक JTA-55/2006(pt) आणि JTA-06/2014 या जेटीए विभागाच्या रेकॉर्डमध्ये सापडत नाहीत. त्यामुळे, या विभागाच्या सर्व विभागांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या नोंदींमध्ये प्राधान्याने या फाईल्स बाबत शोधमोहीम राबवावी. या फायली उपलब्ध झाल्यास ताबडतोब जेटीए विभागाकडे जमा कराव्यात.' (हेही वाचा: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर Supreme Court ची तीक्ष्ण टिप्पणी; गुजरात सरकारकडे मागितली कारणे)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement