Punjab: कट्टरपंथी अमृतपाल पोलिसांना चकमा देऊन फरार, पंजाबमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

अमृतपाल सिंग याला जल्लूपूर खेडा गावातील गुरुद्वारा साहिबला घेराव घालण्यात आला आहे. आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंजाब पोलिसांनी (Punjab Police) खालिस्तानी समर्थक अमृतपालच्या (Amritpal Singh) आणखी पाच साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 78 जणांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग याला जल्लूपूर खेडा गावातील गुरुद्वारा साहिबला घेराव घालण्यात आला आहे. आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याला कधीही अटक होऊ शकते. दरम्यान, हाय अलर्ट जाहीर करून रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट/एसएमएस सेवा बंद (Internet Service) करण्यात आली आहे. बारा जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. अमृतपालला पोलिसांनी अटक केली मात्र तो चकमा देऊन पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या ताफ्याने त्याचा पाठलाग करून घेराव घालण्यात आला.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement