Pune Traffic Update: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखींच्या पार्श्वभूमीवर पहा 22 जून दिवशी पुण्यात कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्ग कोणते

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे-सासवड-लोणंदमार्गे पंढरपूरकडे जाईल. तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे-सोलापूर रोड, रोटी घाट-बारामती-इंदापूर-अकलूजमार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.

Photo Credit - X

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी 20 जूनला पुण्यात दाखल होणार असून पंढरीसाठी 22 जून दिवशी मार्गक्रमण करणार आहे. या पालख्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे ट्राफिक विभागाकडून काही मार्ग सामान्य लोकांसाठी वाहतूकीसाठी बंद केले आहेत. त्याऐवजी काही पर्यायी मार्ग वापरण्यास सुचवले आहे. त्यामुळे पुण्यात पुढील काही दिवस प्रवास करताना पालख्यांचं वेळापत्रक पहायला विसरू नका. दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, पुणे अधिकाऱ्यांनी पालखी मार्गांवरील मांसाहारी हॉटेल्स, मासे बाजार, कत्तलखाने आणि दारूची दुकाने तात्पुरती बंद करण्याची विनंती जारी केली आहे. Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय. 

22 जून दिवशी पुण्यात वाहतूक मार्गात बदल

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement