Pune Crime: पुण्यात जोडप्यांवर प्राणघात हल्ला, भररस्तात कोरेगाव परिसरात हल्लेखोरांनी केला हल्ला
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कोरेगाव परिसरात एका जोडप्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे.
Pune Crime: पुण्यातील कोरेगाव परिसरात एका रशियन जोडप्यावर प्राणघात हल्ला झाल्याचे पुणे पोलीस अधिकारांनी सांगितले आहे. याप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. शेरगी अलेक्झांडर एशान आणि पत्नी डारिया आणि त्यांच्या कुत्रासोबत कोरेगावच्या पार्क लेन 3 मध्ये फिरत असताना ही घटना घडली. अचानक अनोळखी तीन व्यक्ती ह्या जोडप्यांच्या येथे आले आणि ईशानवर हल्ला केला. सुरुवातीला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर धारदार वस्तूने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. एशानला त्याची पत्नी मदत करत तीलाही एकाने धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा- दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस;)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)