Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने दिली Draupadi Murmu यांना उमेदवारी

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे.

Draupadi Murmu (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पक्ष मुख्यालयात झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 29 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement