Pre-Wedding Photoshoot at Police Station: पोलीस जोडप्याने फिल्मी अंदाजामध्ये स्टेशनमध्ये केले प्री-वेडिंग फोटोशूट; व्हिडिओ व्हायरल (Watch)

तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार भावना असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ती पुंजागुट्टा पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक आहे, तर तिचा पती रवूरी किशोर सशस्त्र राखीव दलात एसआय आहे.

Pre-Wedding Photoshoot at Police Station

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय खास क्षण असतो आणि या सुंदर क्षणाला आणखी खास आणि संस्मरणीय बनवण्यासाठी जोडपे शक्य ते सर्व प्रयत्न करत असतात. अशात सध्या प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. प्री-वेडिंग फोटोशूटसाठी कपल्स अनेकदा रोमँटिक लोकेशन्सवर जातात. प्री-वेडिंग फोटोशूटशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. सध्या असेच एक प्री-वेडिंग फोटोशूट लोकांचे लक्ष वेधून घेत आहे व ज्याची सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. हे जोडपे हैदराबाद पोलिसात आहेत. त्यामुळे पोलिसांचा गणवेश, पोलीस वाहन, पोलीस ठाणे अशा अनेक गोष्टी व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार भावना असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ती पुंजागुट्टा पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक आहे, तर तिचा पती रवूरी किशोर सशस्त्र राखीव दलात एसआय आहे. त्यांचा विवाह 2 ऑगस्ट रोजी झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या जोडप्याचे (आणि व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचेही) अभिनंदन केले. पण आपल्या वैयक्तिक व्हिडीओसाठी हैदराबाद पोलिसांचा गणवेश, वाहने, परिसर आणि लोगो वापरला यावर काही लोक संतापले होते. (हेही वाचा: Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement