Exit Polls वरील चर्चेत राजकीय पक्ष सहभागी; पवन खेडा यांच्या एक्स पोस्टनंतर यु-टर्न

पवन खेडा आणि त्यांच्या काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी आणि सत्ताधारी पक्ष विविध प्रसारमाध्यमांतून जाहीर होणाऱ्या एक्झीट पोल्स निकालांवरील चर्चेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pawan Khera | (Photo Credits: Facebook)

पवन खेडा आणि त्यांच्या काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी आणि सत्ताधारी पक्ष विविध प्रसारमाध्यमांतून जाहीर होणाऱ्या एक्झीट पोल्स निकालांवरील चर्चेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस प्रवक्ते खेडा यांन आगोदर आम्ही या चर्चेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर निर्णय बदलण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने केलेल्या एक्स पोस्टनुसार, आजच्या भारत आघाडीच्या बैठकीबद्दल, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विट केले, "भारतीय पक्षांनी भेट घेतली आणि प्रीफिक्स्ड एक्झिट पोलवर भाजप आणि त्याची इकोसिस्टम उघड करण्याचा निर्णय घेतला. एक्झिट पोलमध्ये भाग घेण्याच्या बाजूने आणि विरुद्ध घटकांचा विचार केल्यानंतर, सर्वसहमतीने निर्णय घेण्यात आला आहे की सर्व भारतीय पक्ष आज संध्याकाळी टेलिव्हिजनवरील एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होतील." (हेही वाचा, Lok Sabha Exit Poll 2024: लोकसभेच्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पवन खेरा यांची घोषणा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now