निवडणुकीतील विजयानंतर Narendra Modi पोहोचले आई Hiraben Modi यांच्या भेटीला; एकत्र जेवणही घेतले (See Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि तिच्यासोबत जेवणही केले

PM Narendra Modi and Hiraben Modi (संग्रहित संपादित प्रतिमा)

विधानसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उशिरा वेळ काढून त्यांची आई हीराबेन मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि तिच्यासोबत जेवणही केले. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारीच गुजरातमध्ये पोहोचले आहेत. दिवसभर त्यांनी गुजरातमध्ये रोड शो आणि इतर कार्यक्रमात भाग घेतला. पण आईला भेटण्यासाठी त्यांनी संध्याकाळची वेळ राखून ठेवली होती. पंतप्रधान दोन वर्षांनी आईला भेटले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement