PM Narendra Modi यांचा मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना सध्या अयोध्या राम मंदिराला भेट न देण्याच्या सल्ला

दरम्यान काल जेपी नड्डा यांचा अयोद्धा दौरा देखील भाविकांच्या गर्दीमुळे रद्द करण्यात आला आहे.

PM Modi In LS | PC: X/ANI

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या अयोध्या राम मंदिराला भेट न देण्याचा सल्ला दिला आहे. प्रचंड गर्दीमुळे आणि प्रोटोकॉलसह व्हीआयपींमुळे होणारी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, केंद्रीय मंत्र्यांनी मार्चमध्ये अयोध्या दौऱ्याचे नियोजन करावे असे पंतप्रधानांनी सूचवल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने ANI कडून देण्यात आली आहे. Maharashtra CM Ayodhya Ram Temple Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा अयोद्धा दौरा फेब्रुवारी महिन्यात! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now