PM Modi Hugs and Greets Pope Francis: इटलीतील G7 शिखर परिषदेच्या सत्रात पीएम नरेंद्र मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट; भारतात येण्याचे आमंत्रण दिले (See Pics and Video)
पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यातील ही भेट खूप संस्मरणीय ठरली.
PM Modi Hugs and Greets Pope Francis: पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 व्या G7 शिखर परिषदेसाठी इटलीत आहेत. यावेळी त्यांनी कॅथोलिक चर्चचे प्रमुख, रोमचे बिशप आणि व्हॅटिकन सिटी राज्याचे सार्वभौम 'पोप फ्रान्सिस' यांची भेट घेतली. फ्रान्सिस यांनी पंतप्रधान मोदींना पाहताच मिठी मारली. पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यातील ही भेट खूप संस्मरणीय ठरली. यावेळी मोदींनी फ्रान्सिस यांना त्यांची प्रकृतीबाबत विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आणि त्यांनी लोकांची सेवा आणि ग्रह सुधारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. पोप फ्रान्सिस यांनी शुक्रवारी सात देशांच्या 'जी7' गटाला संबोधित केले. (हेही वाचा: Pope Used Vulgar Term For Gay People: पोप फ्रान्सिस यांच्याकडून समलैंगिक लोकांसाठी अपमानास्पद भाषेचा वापर; Vatican ने मागितली जाहीर माफी)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)